उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत राबविण्यात आला आहे. यावर अंतिम मतदार यादी दि. 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये जिल्ह्यातील एकूण 4 विधानसभांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 17 हजार 909 मतदारांची वाढ झाली असून यामध्ये 9 हजार 241 मतदारनोंदणी महिलांची आहे.दि. 31 ऑगस्ट रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारयादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा
सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या तुलनेत पुरूष मतदारसंख्या 8 हजार 668 व महिला मतदारांची संख्या 9 हजार 241 ने वाढली आहे. जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या मतदारयादीच्या तुलनेत 18 ते 19 वयोगटाच्या मतदारांमध्ये 23 हजार 358 वरून 29 हजार 67 इतकी वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील सैनिक मतदारांची संख्या 2 हजार 665 इतकी आहे.
आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने अंतिम मतदारयादीमध्ये सर्व नागरिकांनी आपल्या नावाची पडताळणी करावी. त्याकरता नागरिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडील मतदार यादी, 1950 या टोल फ्री क्रक्रमांकावर कॉल करून चौकशी, 222.ठ्ठ1ह्यश्च.शह्म्द्द.द्बठ्ठ/222.ष्द्गशद्वड्डद्धड्डह्म्ड्डह्यद्धह्लह्म्ड्ड.द्दश1.द्बठ्ठ या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच जिल्ह्यातील मतदारांनी मतदारयादीमधील आपल्या नावाची पडताळणी करून मतदान प्रकियेमध्ये सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. प्रताप काळे यांच्याकडून करण्यात आले आहे.  
 
Top