| उस्मानाबाद /प्रतिनिधी- येथील भाई उद्धवराव पाटील विचारमंचच्या वतीने झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील जन्मशताब्दी आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे १६ सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यसंकुलात या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. स्पर्धेसाठी (१) महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अष्टपैलू नेतृत्व-झुंजारसेनानी भाई उद्धवराव पाटील, (२) रुपेरी पडदा-समाजाचा आरसा?, (३) हैदराबाद मुक्तिसंग्रामातील मराठवाड्याच्या बलिदानाचा महाराष्ट्राला विसर पडलाय का?, (४) लोकशाहीत राहतो आपण!, (५) शिक्षणातील alt147मार्क'वाद गुणवत्तेस मारक?, (६) जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ-तुकाराम व (७) जीवन त्यांना कळले हो हे विषय राहणार आहेत. स्पर्धेकरिता २८ वर्षाआतील एका महाविद्यालयातून ४ स्पर्धक पाठवता येतील. तरी दि. १० सप्टेंबरपर्यंत कृष्णा तवले (९७६३९७९४८३) व आदित्य पाटील (७०३०७२४६२३) या क्रमांकावर आपले नोंदवण्याचे आवाहन निमंत्रक तथा राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय पाटील यांनी केले आहे. |