उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील वडगाव (जहांगीर)या गावात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी गावक-यांशी संवाद साधला.
यावेळी लीड बँक मॅनेजर निलेश विजयकर, उपायुक्त, पशुसंवर्धन डॉ.पसरटे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ब्रांच मॅनेजर मुंडे, तहसिलदार मंजुषा लटपटे, तालुका कृषी अधिकारी संसारे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी गावक-यांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर गावक-यांना या योजनांचा लाभ मिळताना येणा-या अडचणींविषयी सविस्तर चर्चा झाली.

 
Top