उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुंबई पुन्हा एकदा आज मुसळधार पावसाने झोडपून काढले, शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे लोकल सेवा बंद करण्यात आली. तर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई शहरातील वसई, विरार, बोरीवली, अंधेरी, सायन आदी भागात कंबरेइतके पाणी साचल्यामुळे अनेक घरात, व्यापारी प्रतिष्ठाणामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. बोरवली मध्ये शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांचे चिरजीव अमोल बोरकर व त्यांच्या सहका-यांनी बोरीवलीतील भागात फिरून अनेकांना मदतीचा हाथ पुढे केला.
उस्मानाबाद जिल्हयातील निवासी व मुंबई शहरातील बोरीवलीतील शिवसेना शाखा क्र.९ चे शाखा प्रमुख अमोल बोरकर व त्याच्या सहका-यांनी गोराई, एम एच बी कॉलनी, योगी नगर, आदी विविध भागातील चाळीतील घरामध्ये शिरलेले पाणी पाहून अनेकांना मदतीचा हाथ दिला. त्यामुळे अशावेळी शिवसेना धावुन येते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या संस्कारामध्ये संपर्क प्रमुख शंकरराव बोरकर हे वाढलेले असल्यामुळे त्यांचाच गुण अमोल बोरकर यांनी अंगीकारला आहे. शंकरराव बोरकर यांनी जिल्हयात अनेकांना कठीण समयी मदतीचा हाथ दिला आहे. त्यामुळे अमोल ने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.