लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील राष्ट्रवादी कॉग्रैसचे जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर सिरसाठ जेवळे व शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष भास्कर माने यांनी लोहारा शहरात दि.10 सप्टेंबर 2019 रोजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास (दादा) शिंदे व तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी कमलाकर सिरसाठ जेवळे व भास्कर माने यांचा कैलास (दादा) शिंदे यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, रो.ह.यो चे माजी चेअरमन तथा नगरसेवक आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी आयुब हबीब शेख, रहेमान (दादा) मुल्ला, वि.का.साे. चेअरमन प्रशांत लांडगे, आेबीसी माेर्चा तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, विदयार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, आेबीसी शहराध्यक्ष सुमित झिंगाडे, लक्ष्मन माने, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
