उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राणा जगजितसिंह पाटील पक्षांतर करून भाजपा मध्ये गेल्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये कॉंगे्रस-शिवसेना-राष्ट्रवादी सदस्यांनी भ्रष्ट कारोबार चालू असल्याचा आरोप करीत गदारोळ केला.
उस्मानाबाद जिल्हा परिषद ची सर्वसाधारण सभा बुधवार दि.४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता संपन्न झाली. सभेमध्ये राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गिते, यांनी समाजकल्याण चा ७२ कोटी ४० लाखाचा निधी २५ फे्रबुवारीला आलेला असताना तो का वाटप केला गेला नाही. ज्या निधीचे वितरण केले गेले आहे, ते वितरण कांही लोकांनी टक्केवारी घेऊन वितरण केले आहे. लोकसंख्या प्रमाणे वितरण आवश््यक असताना केलेले वितरण रद्द करावे,अशी मागणी केली. या मागणीला कॉंग्रेसचे शरण पाटील, बाबुराव चव्हाण, रफीक तांबोळी, राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे, शिवसेनेचे कैलास पाटील, दत्ता साळुंके, धनंजय सावंत, आदींनी ही मागणी उचलुन धरली. सदर मागणी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील यांनी धुडकावून लावली. तरीपण सभागृहातील सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हेते. त्यामुळे गदारोळात वाढ झाला. अखेर बाबुराव चव्हाण यांनी निधी वाटप रद्द करायचे नसेल या मागणीवर मतदान घ्या, अशी मागणी केली. परंतू ही मागणीपण जि.प.अध्यक्षांनी धुडकावून लावली. विरोधकांनी बहिष्कार टाकत २० ते २२ जण विरोधी पक्षाच्या दालनात जमा झाले.