लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरातील राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसच्या पदाधिका-यांचा भाजप पक्षात प्रवेश झाल्याबध्दल शहरातील नगरसेवक आयुब अब्दुल शेख व शब्बीर गवंडी, आयुब हबीब शेख, दादा मुल्ला, यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, आब्बास शेख, महामुद कमाल, इरफान शेख, एजाज मनियार, राम बाभळे, सुधाकर,पोतदार, सद्दाम शेख, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top