उस्मानाबाद/प्रतिनिधी-15 रुपयांच्या बिलासाठी झालेल्या मारहाणीत नेट कॅफे चालक दशरथ पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना उस्मानाबाद शहरातील बसस्थानक परिसरातील एन्जॉय नेट कॅफे येथे गुरुवारी (दि.5) सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली असून आरोपीला अर्ध्या तासात अटक करण्यात आली. दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.
शहरातील एन्जॉय नेट कॅफे येथे घाटंग्री येथील दशरथ गेमा पवार जवळपास पाच वर्षांपासून काम करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किणी येथील विनोद लंगळे नेट कॅफेत येत होता. प्रत्येक वेळी अर्धा तास बसणार असल्याचे सांगत होता. मात्र, अर्ध्या तासापेक्षा 10 ते 15 मिनिट अधिक बसत होता. त्यामुळे नेट
कॅफेवरील कामगार पवार हे एक तासाचे बिल मागत होते. त्याप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये लंगळे याने एक तासाचे बिल दिले होते. मात्र, गुरुवारी (दि.5) लंगळे अध्र्या तासापेक्षा 5 मिनिट अधिक बसूनही एक तासाचे बिल देण्याऐवजी अध्र्या तासाचे 15 रुपये देऊन निघून जाताना नेट कॅफेवरील कामगार पवार याने अर्ध्या तासापेक्षा अधिक पाच मिनिटे झाली आहेत. तुम्हाला एक तासाचे 30 रुपये बिल द्यावे लागेल. पाच मिनिटही अधिक बसणारांकडून अध्र्या तासाचे बिल घेण्याबाबत मालकांनी सांगितले आहे. तुम्ही पैसे न दिल्यास आम्हाला द्यावे लागतात. त्यावर लंगळे याने तु प्रत्येक वेळी माझ्याकडून अधिक पैसे घेतोस, देत नाही जा काय करायचे ते कर असे म्हणून निघून जात होता. त्यावेळी पवार यांनी लंगळे याला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत व मारहाणीत पवार यांच्या पोटात (अवघड जाग्यावर) लाथ मारल्याने पवार पाठिमागे भिंतीवर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान नेट कॅफेतील काही तरुणांनी पवार यांना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले व पोस्टमॉर्टम रूमध्ये दाखल केले. मात्र, कोणताही रिपोर्ट दिला नाही. तसेच आरोपीला नेट कॅफेतील काही तरुणांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केले. त्यावेळी शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड करत आहेत.