तुळजापूर / प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेस व येडेश्वरी देवीस पुणे येथील एका देविभक्ताने श्रध्देपोटी चांदीचा मुकुंट अर्पण केला आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, पुणे येथील कोलवडी भागात खरेदी विक्री व्यवसाय करणारे व आयुर्वेद पंचकर्म सेंंटर चालविणारे अजित रामदास कदम यांना विविध कामांन मध्ये यश मिळत असल्याने श्री तुळजाभवानी देवीच्या कृपा आशिर्वाद मुळे हे यश मिळते या श्रध्देपोटी  श्री  तुळजाभवानी मातेस आठशे ग्राम वजनाचा व येडाईस सवा किलो वजनाचे टोप आज अर्पण केले.
गुरुवारी सकाळी अभिषेक केल्यानंतर हा चांदीचा टोप किंमत मजुरीसह 1 लाख ,46 हजार रुपये किमतीचे अर्पण केला. या पुजेचे पौराहीत्य भोपेपुजारी किशोर उध्दवराव भैय्ये यांनी केले. त्यानंतर येडाईला जावून येडाईस अर्पण केला.हे चांदीचे टोप तुळजापूर येथे हिरोळीकर यांच्याकडे तयार केले आहेत.

 
Top