उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जालना येथील महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणा-या स्वािभमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांचा प्रशासनाने धसका घेतल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. औरंगाबादेत शनिवारी होणा-या पंतप्रधान व मुख्यमंत्र्याच्या सभेच्या पाश्र्वभूमीवर पूजा मोरे यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेे. मात्र, पोलिसांच्या एकूणच वर्तनावरून संताप व्यक्त करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी ठाण्यात धाव घेतली. त्यांनी फेसबुक लाइव्ह केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलिस अधिका-यांना संपर्क साधला. त्यानंतर मोरे यांची रात्री 10 वाजता सुटका करण्यात आली.
मराठवाड्यात पावसाअभावी शेतकरी हवालदील असून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेद्वारे विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमत्र्याची महाजनादेश यात्रा मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा 25 ऑगस्ट रोजी दिला होता. या इशा-यानंतर आठवडाभरातच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जालना येथे आली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले होते. त्यानंतर जामिनावर सुटलेल्या पूजा मोरे 16 सप्टेंंबर रोजी शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद येथे काढण्यात येणा-या आक्रोश मोर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी उस्मानाबादेत आल्या होत्या. यावेळी त्यांनी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात माहिती देऊन माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले. पत्रकार परिषद संपवून त्या खाली येताच स्थानिक गुन्हे शाखा व आनंदनगर पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलिस व्हॅनमध्ये घालत आनंदनगर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांना कोणत्या कारणासाठी ताब्यात घेत आहेत अशी विचारणा करणाऱ्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी हा प्रकार समजताच आनंद नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना जाब विचारला तसेच संताप व्यक्त हा प्रकार चव्हाट्यावर आणला.