परंडा /प्रतिनिधी- विद्यार्थी या देशाचे भवितव्य आहे त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी त्यांच्या भवितव्यासाठी प्राध्यापकांनी प्रामाणिकपणे योगदान द्यावे असे मत महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात आयोजीत केलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटन प्रसंगी त्यांनी व्यक्त केले. 
महावियालयातील ब्रॉडकास्टींग अँड जर्नालीझम, प्रोफेशनल अकौंटिंग अँड टॅक्शेसन विभागाच्या लॅबचे उदघाटन दि.१६ शुकवार रोजी ना.डॉ.तानाजी सावंत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगूरु डॉ.प्रमोद येवले, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओम राजेनिंबाळकर,यांच्या हस्ते करण्यात आले. 
    यावेळी व्यासपीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद चे माजी संचालक प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके,जि.प.गटनेता दत्ता आण्णा साळूंके  अनिल खोचरे, जि.प. सदस्य धनंजय सावंत, आकाशवाणी उस्मानाबाद चे कार्यकारी अधिकारी संजय बरिदे, डोईफोडे, साखरे, लॅब डेव्हलोपर मनोज पित्रोदा, अॅड संतोष सुर्यवंशी,मेघराज पाटील, संजयपाटील दुधगांवकर संस्थेचे सचिव संजय निंबाळकर,अध्यक्ष सुनिल शिंदे आदीसह उपस्थित होते. 
  यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या सामाजीक अपप्रवृती विरुद्ध लढा देणाऱ्या मध्ययूगिन संत कवयित्री,डॉ.अरुण खर्डे यांच्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि शेळी व मेंढी व्यावसायाचे अर्थशास्त्र या दोन पूस्तकाचे,डॉ. प्रकाश सरवदे यांच्या टेक्स्ट बुक ऑफ फंगी आणि प्लैन्ट डीसीजेस आणि प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्या.इफेक्ट ऑफ हेवी मेटल्स ऑन सम मेजर कार्पस अ हिस्टॉलॉजीकल स्टडी या पूस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ.दीपा सावळे व संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. 
     अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले की ग्रामीण भागामध्ये बी व्होक सारखे कोर्स चालू केल्यामूळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.उदघाटन प्रसंगी पूढे बोलताना ना.डॉ.तानाजी सावंत म्हणाले की विद्यार्थ्यासाठी जूनी शिक्षण पद्धतच उत्तम होती.जे इतिहास व भूगोल विसरतात ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत. महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न मी करेन असे गव्हाई दिली. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक विभागप्रमूख प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे व प्रा.संभाजी धनवे यांनी केले. यावेळी सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांना विद्यार्थी,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थेच्या वतीने ५१ हजार रुपयाची मदत निधी म्हणून मंत्री महोदय डॉ.तानाजी सावंत यांना देण्यात आले. यावेळी शहरातील,तालूक्यातील व जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजीक व राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा.सज्जन यादव यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
 
Top