उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतीय स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून रुपामाता नॅचरल शुगर पाडोळी येथे येणारा गळीत हंगाम पूर्वतयारीची रोलर पूजन करून सुरुवात करण्यात आली. रुपामाता कारखान्याचा येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी कारखान्यातील यांत्रिक पूर्वतयारी आज मान्यवरांच्या हस्ते रोलर पूजन करून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी तसेच रुपामाता शुगरचे चेअरमन व्यंकटराव गुंड, पाडोळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भरत दाजी गुंड, राजेंद्र शिराळ तसेच मेंढा गावचे राजाआबा जावळे, व्यंकट कंदले कारखान्याचे सरव्यवस्थापक सूर्यकांत गरड मुख्य अभियंता सचिन गुंड पाडोळी चे पोलीस पाटील धनंजय गुंड इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन अँड गुंड यांनी सांगितले की आपला कारखाना हा दर दिवशी 1000 मेट्रिक टन याप्रमाणे चालण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सर्व कर्मचा-यांनी करून घ्यावी जेणेकरून सीजन चालू झाल्यानंतर कुठल्याही अडथळ्याविना येणारे सीजन पार पडेल. या कार्यक्रमासाठी कारखाना कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.