उमरगा /प्रतिनिधी-
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन कैलास शिंदे यांचा वाढदिवस भाजपाच्या वतीने लोहाच्या शहरातील लोकवाचनालय येथे गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप, वृक्षलागवड, रुग्णांना फळवाटप आदी विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात आला. 
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त १५ आॅगस्ट रोजी लोहारा शहरातील व तालुक्यातील गरिब महिलांना मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. तसेच लोकवाचनालय व बसस्थानक परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. व लोहारा ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा नोंदणी प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटील, पंस सदस्य वामन डावरे, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, शुभाष गिरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, मिडिया तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, लोकवाचनालयाचे सचिव माणिक तिगाडे, विजय महानुर, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, बालासिंग बायस, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ घोडके, आेबीसी शहराध्यक्ष सुमित झिंगाडे, शहराध्यक्ष अशोक तिगाडे, तुकाराम विराेधे, दादा काळे, सदाम सुंबेकर, अब्बास शेख, गणी शेख, लक्ष्मण भाेरे, मनिषा महानुर, जयश्री लांडगे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित हाेते. तर उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षातर्फे कैलास शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. 
 
Top