तुळजापूर/प्रतिनिधी-
नळदुर्ग रोडवरील कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कै. नागरबाई संपतराव कुतवळ यांच्या स्मरणार्थ व 15 ऑगस्ट निमित्ताने आयोजित चौथ्या मोफत नेत्ररोग शिबीराचा ५०० रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबीराचे उद्घाटन आयएमए अध्यक्ष तुळजापूर डॉ. आबासाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीराच्या सुरवातीला नेत्रशस्त्रक्रियेस आवश्यक फेको व फडंस कॅमेराचे उद्घाटन डॉ. नरसिंग मलबा व डॉ. सुरेद्रं पेशवे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनच्या कार्यक्रमास तुळजापूर शहरातील सर्व डॉक्टर्स आवर्जून उपस्थित होते. सदर शिबीर दि. 15 व 16 रोजी तुळजापुरमध्ये व 17 रोजी लोहारा येथे घेण्यात आले होते. सदर शिबीरात डॉ. मयुरी कुतवळ यांनी 310 रुग्णांची तपासणी करून चष्म्याचा नंबर काढणे तसेच सर्व रुग्णांना मोफत औषधे वाटप केले तर 60 जणांना सवलतीच्या दरात तात्काळ चष्मे देण्यात आले व 40 रुग्णांची सवलतीच्या दरात मोतीबिंदू व पडदा काढणे शस्त्रक्रिया करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. काचबिंदुच्या रुग्णांना तपासणीसाठी व पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन डॉ. मयुरी कुतवळ यांनी केले.सदर शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात हॉस्पिटलचे कर्मचारी श्री यादव, मुकेरकर, तरंगे, श्रीमती कांबळे व इतरांनी परिश्रम घेतले. दिशा ऑप्टिकलचे दिनेश मिश्रा व विष्णु मिश्रा यांनी सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून दिले.