प्रतिनिधी-उमरगा/लोहारा-
तालुक्यात यावर्षी पावसाळ्याचे तीन महिने लोटला तरी समाधान कारक पाऊस पडला नसल्यामुळे खरिप पिके धोक्यात आली आहेत. तर पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवटच्या महिन्यात तरी परतीचा पाऊस सर्वत्र चांगला पाऊस पडावा म्हणून लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील प्राचीन दिलालपुर हनुमान मंदिरात सोमवार दि. 19 पासून नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ पारायनाला प्रारंभ करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील दुष्काळ व पाणीटंचाई कायम स्वरूपी हटावा, नदी, नाले, तलाव पाण््याने तुुडूंब भरावीत, चारा पाण्या अभावी पशु पक्षी व जनावरांचे होणारे हाल थांबून मुबलक चारा उपलब्ध व्हावा यासाठी उमरगा येथील नवनाथ भक्त पारायण (न.भ.प.) माधव महाराज सुर्यवंशी यांनी सोमवार दि.19 ऑगस्ट पासून लोहारा तोरंबा येथील प्रसिद्ध प्राचीन दिलालपूर हनुमान मंदीरात सात दिवसीय नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ पारायन सोहळा सुरू करून दमदार पावसा साठी साकडे घातले आहे. दररोज सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत पारायण व रविवार,दि. 25 रोजी सोहळ्यात दुपारी महाआरती आरती नंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटपाने सांगता करण्यात येणार आहे.