विकास उबाळे / प्रतिनिधी -
उस्मानाबाद तालुक्यातील विकसनशील असलेल्या कसबे तडवळे, उपबाजारपेठला चालना देण्यासाठी जलद रेलवे गाडयांना थांबा देऊन तडवळे रेल्वे स्थानकाचा विकास करावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतू या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून फक्त निवडणुकीमध्ये मात्र तोंडभरून आश्वासन दिले जाते. निवडुन आल्यावर मात्र तडवळे रेल्वेस्थानक व जलद रेल्वे गाडयांना थांबा देणे याकडे दुर्लक्ष केले जाते. विद्यमान खा.ओमराजे निंबाळकर यांनी तडवळ्याचा रेल्वे स्थानकाचा प्रश्र व जलद गाडयांना प्रश्र सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे हे तालुक्याची उपबाजार पेठ म्हणून ओळखली जाते, तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावांपैकी हे एक गाव. परिसरातील सहा साखर कारखान्याला, मोठ-मोठे व्यापारी वर्गांना जवळ असलेले कसबे तडवळे येथील कळंबरोड रेल्वे स्थानक. व्यापार म्हंटला की रेल्वे वाहतूक येतेच, येथील कळंबरोड रेल्वे स्थानकाचा उस्मानाबाद,कळंब, केज, तालुक्याचा संपर्क जवळ होतो. परंतु नॅरोगेज रेल्वे लाईन (छोटी) ची ब्रॉडगेज रेल्वे लाईन (मोठी)26 सप्टेंबर 2007 मधे टाकण्यात आली.व पहिली रेल्वे उस्मानाबाद ते परळी चालू झाली ,या काळापासून तीन खासदार होऊन गेले सर्वांनी शब्दच दिले प्रत्यक्षात काम कोणीच केले नाही ,पण आता नूतन खासदार ओमराजे निंबाळकर यांना या गावाने निवडणुकीत कायम भरघोस मतांनी निवडून दिल्याने ग्रामस्थांना आशा लागल्या आहेत. कळंबरोड हे स्टेशन 1907 इंग्रज काळापासून   क्रक्रॉसिंग स्टेशन होते परंतु 2007 पासून  या रेल्वे स्थानकावर कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत त्यामुळेच कळंबरोड रेल्वे स्टेशन हे फक्त नावालाच असल्याचे दिसून येते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कसबे तडवळे हे गावं  जुन्या काळी इंग्रज यांचे शेवटचे ठिकाण होते पुढे ढोकी निजामशाही मध्ये होती त्याकाळी बार्शी तालुक्यातील उपबाजार पेठ म्हणून कसबे तडवळे गावाची ओळख होती. सन 2007 मध्ये नॅरोगेज ची ब्रॉडगेज लाईन करण्यात आली त्यावेळी पासून या स्थानकावर कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध झाल्या नाहीत शिवाय येथील होल्ट उडवण्यात आला.
कळंबरोड रेल्वे स्थानकाच्या परिसरातील सहा साखर कारखान्याला वाहतुकीसाठी जवळचे स्थानक असल्याने या सहा कारखान्याने येथे थांबा मिळण्यासाठी ठराव दिलेले असून येथे रँक देखील उभा करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब मेडिकल असोशियन, कळंब व्यापार संघ, कळंब नगर पालिका व परिसरातील 22 ग्रामपंचायतीचा ठराव येथे थांबा मिळण्यासाठी दिलेला येथील रेल्वेस्थानकावर एक पॅसेंजर गाडी सोडली असता कुठल्याही जलद गाडीचा थांबा नाही. त्यामुळे पुणे, मुंबई, हैदराबाद, नांदेड, अमरावती  सारख्या शहरांना जाण्यासाठी परिसरातील नागरिकांना उस्मानाबाद, लातूर किंवा कुर्डूवाडी गाठावे लागते. त्यामुळे प्रवाशांचे जास्त पैसे तर खर्च होतातच सोबतच जाण्यासाठी विलंब होत असल्याने रेल्वे निघून जातात. त्यामुळे नाईलाजास्तव खाजगी बसेस मधून प्रवास करावा लागतो. अशात मनस्ताप देखील सहन करावा लागतो. त्यामुळे येणाऱ्या काळात तरी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे स्थानकाच्या बाबतीतील रेल्वे संघर्ष समितीच्या  मागण्या मान्य होतील का हे जरी आता सांगणे कठीण असले तरी परिसरातील प्रवासी नागरिक मात्र त्या दिवसाची वाट पाहत आहेत.

कळंब रोड रेल्वेस्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळणे अत्यावश्यक असून परिसरातील कळंब केज धारूर वाशी सह परिसरातील गावांना जोडणारा हा जवळचा रेल्वे मार्ग असून यास सर्व ठिकाणच्या लोकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे कळंब तालुक्यासह या भागातील औद्योगिक विकास खुंटला आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी ऑपरेटिंग स्टेशन उपलब्ध करून जलद गाड्यांना थांबा द्यावा.त्यासोबतच कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब मेडिकल असोशियन, कळंब व्यापार संघ, कळंब नगर पालिका व परिसरातील 22 ग्रामपंचायतीचा ठराव येथे थांबा मिळण्यासाठी दिलेला आहे    
                        किशोर डाळे -(कळंब रोड रेल्वे संघर्ष समिती अध्यक्ष)
----------
संपूर्ण कळंब व केज  तालुक्यासाठी कळंब रोड (तडवळे) हे रेल्वेस्टेशन अत्यंत जवळ असल्याने कळंब बरोबरोबर केज तालुक्यातील लोकांना मुंबई ,पुणें जाणेसाठी सर्वांत जवळचे व गावालगत एकमेव रेल्वे स्टेशन कळंब रोड असून येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे द्यावेत व क्रोर्सिंग स्टेशनचे अपूर्ण काम पूर्ण करावे असा ठराव कळंब नगरपालिका ने गतवर्षीच दिला आहे  जिल्ह्याचे नूतन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याकडे लक्ष वेधून लवकर या कळंब रोड रेल्वेस्टेशन चे अपूर्ण काम पूर्ण करणे व एक्स्प्रेस रेल्वेला थांबा द्यावा अशी सर्व कळंब तालुक्यातील नागरिकांतर्फे मागणी आहे
                      सतीश टोणगे -नगरसेवक  कळंब नगरपालिका कळंब 
 
Top