उस्मानाबाद/प्रतिनिधी-  जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय, उस्मानाबाद नेत्रतज्ञ संघटना व जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने आज राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 34 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा निमित्त नेत्रदान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे-पाटील, उस्मानाबाद नेत्रतज्ञ संघटनेचे सचिव डॉ.मिलिंद पोळ , नेत्र शल्यचिकित्सक डॉ.एम.के. पल्ला, डॉ.अर्चना गोरे, डॉ.महेश पाटील, डॉ.विरभद्र कोटलवाड, जे.एफ.अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय श्री. अतुल देशमुख, श्री.शिवरुद्र इसाके व सर्व कर्मचारी तसेच नेत्रचिकित्सा अधिकारी श्री. बी. एम. घाडगे, श्री. बिडवे आर.डी व अधिसेविका श्रीमती शकुंतला गोरे, रुग्णालयातील कर्मचारी श्री.धैर्यशिल नारायणकर, अशोक मिरगणे, भिकूलाल जाधव, श्रीमती ज्योती  कांबळे, सिध्दार्थ जानराव, नवनाथ सरवदे या मान्यवरांची उपस्थिती होती.
सुरुवातीस या रॅलीला उस्मानाबाद नेत्रतज्ञ संघटनेचे सचिव डॉ.मिलिंद पोळ यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथून हिरवा झेंडा दाखवून काळा मारुती चौक, ताजमहाल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगे महाराज चौक, शहर पोलिस स्टेशन मार्गे जिल्हा रुग्णालय येथे सांगता करण्यात आली.
 या रॅलीकरिता उस्मानाबाद शहरातील के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, के.टी.पाटील कॉलेज ऑफ फॉर्मसी, इंदिरा गांधी कॉलेज ऑफ नर्सिंग, आस्था स्कूल ऑफ नर्सिंग, व परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विदयार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवून रॅली यशस्वी केली. या रॅली दरम्यान नेत्रदानाविषयी घोषवाक्य व फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या रॅलीच्या यशस्विततेकरिता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयातील श्री. संतोष पोतदार, श्री. महादेव शिनगारे, श्री. उमेश गोरे, रुग्णालयातील नर्सिंग स्टॉफ, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 
Top