उस्मानाबाद / प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेच्यावतीने जिल्ह्याचे नूतन पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांचा बुधवार दि. 28 रोजी सत्कार करण्यात आला.
पोलिस अधिक्षक राजतिक रोशन यांनी सोमवारी पद्भार घेतला. पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनूमंत देवकते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मिडीया विभागाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाकुरे पाटील, तालुकाध्यक्ष जोतीराम काटे, मनिषा जगताप, सुनिल अंधारे, रवी पाटील, भैरवनाथ दरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधिक्षकांना 2012-2016 कालावधीतील पोलिस पाटील यांचा प्रलंबित प्रवास भत्ता द्यावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले.