उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांनी युवासेनेच्या जिल्हा समन्वयक पदी अॅड.संजय भोरे यांची नियुक्ती केली आहे. अॅड.भोरे यांनी यापुर्वी तालुका सचिव पदावर काम करत असताना विध्यार्थी व युवकांचे विविध प्रश्न मांडुन ते सोडविले आहेत. पक्षनेतृत्वाने त्यांच्या कार्याची दखल घेउन जिल्हा समन्वयकपदी त्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी सागर देशमुख,अभिजीत मगर,अॅड.संदिप देशमख,संजय तनमोर,शैलेश पवार,सचिन पाटिल,प्रशांत जगताप,राजपाल बागल,आकाश माळी,केदार जाधव,अभिजीत चव्हान,नागनाथ वाघमारे आदी उपस्थित होते.

 
Top