उस्मानाबाद/प्रतिनिधी-सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आलेल्या महाभंयकर पुराने उद््ध्वस्त झालेल्या लोकांचे संसार उभे करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व विभगाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. सास्तूर, किल्लारी येथे झालेला भूकंपात जगभरातून लोकांनी मदत केली व लोकांचे संसार पुन्हा उभे राहिले. त्याची जाण ठेवून माणुसकीच्या दृष्टीने सढळ हाताने मदत करावी. ती मदत जिल्हा काँग्रेसकडे जमा करावी, जमा झालेली मदत पूरग्रस्तांच्या प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या गरजेनुसार वस्तू स्वरूपात पोहचवली जाईल असे प्रामुख्याने नमूद केले. या प्रसंगी राजाभाऊ शेरखाने, मधुकरराव तावडे, विनोद गपाट, खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, सिध्दार्थ बनसोडे, महेबूब पटेल, उमेश राजेनिंबाळकर, आदी उपस्थित होते.पूरग्रस्तांना मदत करा - आ. चव्हाण
उस्मानाबाद/प्रतिनिधी-सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आलेल्या महाभंयकर पुराने उद््ध्वस्त झालेल्या लोकांचे संसार उभे करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व विभगाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. सास्तूर, किल्लारी येथे झालेला भूकंपात जगभरातून लोकांनी मदत केली व लोकांचे संसार पुन्हा उभे राहिले. त्याची जाण ठेवून माणुसकीच्या दृष्टीने सढळ हाताने मदत करावी. ती मदत जिल्हा काँग्रेसकडे जमा करावी, जमा झालेली मदत पूरग्रस्तांच्या प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या गरजेनुसार वस्तू स्वरूपात पोहचवली जाईल असे प्रामुख्याने नमूद केले. या प्रसंगी राजाभाऊ शेरखाने, मधुकरराव तावडे, विनोद गपाट, खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, सिध्दार्थ बनसोडे, महेबूब पटेल, उमेश राजेनिंबाळकर, आदी उपस्थित होते.