उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील पानगांव, दहिफळ, अवधूताडी, तांदूळवाडी, दुधाळवाडी येथील शेतक-यांनी सोमवार २६ ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिक-यांना आपल्या मांगण्याचे निवेदन दिले. हे आंदोलन शेतकरी चरणेश्वर पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता छावणी चालक व पशुपालक हे अडचणीत सापडले आहेत. छावण्यांमधील पशुधन हे स्वत: छावणी चालक खर्च घेवून व बॅंकेचे व खाजगी कर्ज घेवून सदरील छावणीचा खर्च भागवीत होते. परंतु यापुढे छावणी मालकास हा खर्च झेपत नसल्यामुळे छावणी चालक व पशुपालकावर मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालक व छावणी मालक यांना चारा छावणीस मान्यता न मिळाल्यास आत्महत्या करण्याश्विाय दुसरा पर्याय नाही. चारा छावणी मालक व पशुपालक यांचे जिवितास काही कमी जास्त झाल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा यावेळी शेतक-यांनी दिला आहे.जो पर्यंत छावणीस मंजूरी मिळत नाही तो पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू राहणार आहे. आंदोलनात शेतकरी व छावणी चालक मोठया संख्येने सहभागी झाले होते.