उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मी रष्ट्रवादीमध्ये जाणार अशा खोट्या बातम्या पसरवून विरोधकांकडून माझ्या बदनामीचा डाव आखला जात आहे. मी राष्ट्रवादी मध्ये जाणार नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी शिवसैनिक आहे व यापुढे ही राहील, अशा प्रकारची प्रतिक्रिया नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दिली.
मी एक शिवसैनिक आहे. मला शिवसेनेने उस्मानाबाद नगरपालिकेसाठी उमेदवारी दिली. मला नगराध्यक्ष केले. मी विधानसभेसाठी इच्छुक आहे. मला माझ्या पक्षाने (शिवसेनेने) उमेदवारी दिली तरच मी निवडणुक लढविणार आहे. अन्यथा, पक्ष जो उमेदवार देईल त्याचा मी प्रचार करणार आहे. मला शिवसेनेकडून उमेदवारी मिळू नये, यासाठी विरोधकांकडून अशी खटाटोप केली जात आहे. कार्यकत्र्यांनी आशा खोट्या बातम्यांना बळी पडू नये, असे आवाहन मकरंदराजे निंबाळकर यांनी केले आहे.