वाशी/प्रतिनिधी:- राज्यभरातून निघालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात यात्रा सोमवार रोजी उस्मानाबाद जिल्यातील वाशी यथे येऊन ठेपली .यावेळी येथील बास्थांकावर झालेल्या जाहीर सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातून अ गेला तर ब आहे आणि ब गेला तर त्याच्या जागी क आहे असे सांगताच बंद फितुरांच्या जागी आम्ही उमेदवार शोधलेत असे सुतोवाच यावेळी केले.रानादादांच्या असलेल्या अनुउपस्थितीमुळे त्यांच्या या वाक्यांचा राणा दादानांच टोला असल्याची उपस्थितात चर्चा रंगली .
      शिवस्वराज्य यात्रेला खासदार अमोल कोल्हे, आमदार राहुल मोटे,अमोल मिटकरी,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाताई चाकणकर ,यांनी संबोधित केले .यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी भगवा पेलायला मनगटात ताकत नाही तर मनात नितीमत्ता लागते जी तुमच्याकडे नाही असे बोलताना शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला . यावेळी राहुल मोटे यांनी आपल्या पंधरा वर्षातील कामाचा लेखाजोखा वाचत आपल्याला पुन्हा संधी मिळेल याचा विश्वास व्यक्त केला .भाजप मध्ये महिलांना सन्मान नसून महिलांना सन्मान देणारी व्यवस्था केवळ राष्ट्रवादीच्याच सरकार मध्ये मिळु शकते असे प्रतिपादन महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाताई चाकणकर यांनी केले .कार्यक्रमाच्या शेवटी खासदार अमोल कोल्हे बोलत होते त्यांनी सांगितले कि शिवस्वराज्य यात्रेला युवकांची मोठी गर्दी होत असल्याने सत्ताधारी घाबरले आहेत. पाच वर्षांची सत्ता उपभोगल्या नंतर हि त्यांनी केली कामे सांगण्यासाठी सत्ताधार्यांना यात्रा काढावी लागते हे त्यांचे खूप मोठे अपयश आहे .
      या वेळी शहरातील पारा चौक येथून रोड शो ची सुरुवात करण्यात आली .शहरातील मुख्य असलेल्या शिवाजी रोड येथून रोड शो करण्यात आला .यावेळी शहरातील नागरिकांनी अमोल कोल्हे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले .यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते 
 
Top