प्रतिनिधी/तुळजापूर-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे बाल भिका-यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असुन या बाबतीत टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश देवुनही या बाबतीत जबाबदारी घेण्याबाबतीत संबधित खाते अधिकारी  टोलवा टोलवी करीत असल्याने या समस्या बाबतीत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजाईनगरीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. सुट्टीच्या कालावधीत भाविकांची संख्या लाखांच्या घरात जाते. या मोठ्या संख्येने येणा-या भाविकांना तीर्थक्षेत्र तुळजाईनगरीत अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. त्यातच महाद्वार परिसरात भाविकांना भिका-यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात राष्ट्रीय अपराध जांच ब्युरोचे महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी संजय बोंदर यांनी अनेक तक्रारी केल्या. मात्र, मंदिर संस्थान, पालिका, पोलिस, महिला व बाल विकास खाते एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत असल्याने भिक-्यांचा त्रास वाढतच आहे. 
 
Top