उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने दहावी व बारावी परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्र्तीण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनीचा गुण-गौरव सोहळा रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद येथील समर्थ मंगल कार्यालय राजे कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार होणार असून जिल्हा उद्योग केंद्र (ठाणे), महाव्यवस्थापक वैशाली आगाशे, उद्योजक गणेश फुलारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (माहाड) प्राचार्य डॉ. धनाजी गुरव, बालरोगतंज्ञ डॉ. नामदेव बिराजदार (उमरगा), उद्योग तथा राष्ट्रीय गुरव महासंघाचे राष्ट्रीय संघटक बाळासाहेब क्षिरसागर, शिवसेना न.प.गटनेते सोमनाथ गुरव, न.प.विरोधी पक्षनेते युवराज नळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय गुरव महासंघाच्या वतीने  करण्यात आले आहे.  उस्मानाबाद जिल्हयातील गुणवंत विद्याथ्र्यांनी अपनली गुणपत्रिका श्रीनिवास पाटील (९४०३७२५६९७), रवी गुरव तिर्थकर  (९८५०६१६६३६), बालाजी स्वामी (७५८८१९०६५०), समाधान बेंद्रे (८३७८९१३५१५) यांच्या वॉट्सअॅप नंबरवर किंवा ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top