लोहारा/प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील गणेश मंडळ उत्सव समिती अध्यक्षपदी अभिजीत कारागिर तर उपाध्यक्षपदी ज्योतीबा भोसले यांची निवड करण्यात आली. नारंगवाडी येथे गणेश मंडळ उत्सव समितीची बैठक भाजयुमो तालुका सरचिटणीस प्रदिप सांगवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते गणेश मंडळ उत्सव समितीची कार्यकारणी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी अभिजीत कारागीर, उपाध्यक्ष पदी ज्योतिबा भोसले, खजीनदारपदी शिवशंकर पवार, कोषाध्यक्षपदी मुगळे दादा, सचिव पदी आकाश पवार, अदिंची निवड करण्यात आली. यावेळी महेश पवार, लखन मुगळे, संभाजी लोहार, श्रीरंग पवार, आदर्श मुळे, धीरज मोरे, यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top