उस्मानाबाद/प्रतिनिधी-: सद्गुरू श्री रामानंद महाराज यांच्या समाधी शताब्दी सोहळ्यास काजळा (ता.उस्मानाबाद) येथे मंगळवारी (दि.९) मंगलमय, भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. हिरवेगार शिवार.. रिमझिम पावसाच्या सरीवर सरी.. थंडगार वाहणारा वारा... धीप-धुप, अगरबत्तीचा सुगंध.. फुलांचा आरास.. टाळ-मृदंगाचा गजर.. हरिनामाचा जयघोषामुळे अवघी रामानंद नगरी भक्तीरसात चींब झाली आहे. 
काजळा येथील श्री रामानंद महाराज यांच्या समाधी शताब्दीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास हभप नवनाथ महाराज चिखलीकर, हभप दत्ता महाराज अंबीरकर व हभप भीमराव आवटे महाराज वाडीबामणीकर या त्रिमुर्तींच्या शुभहस्ते श्री रामानंद महाराजांच्या पादुकांचे पूजन करुन प्रारंभ करण्यात आला. कलश पूजन उपसरपंच ॲड. विजयदत्त पाटील, श्री सद्गुरु समाधी पूजन श्री स्वामी रामानंद सरस्वती महाराज, श्री दत्तगुरु पूजन भाजपा मीडियाचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, ध्वज-पूजन पांडुरंग खोचरे व दत्तात्रय हाजगुडे, टाळ-मृदंग पूजन महात्मा मगर व आण्णासाहेब खडके, ज्ञानेश्वरी पूजन हभप प्रकाश नाडे, प्रदीप घुटे व सरपंच श्री देटे, श्री तुकाराम गाथा पूजन माजी सरपंच विष्णूदास आहेर व नानासाहेब शिंदे, श्री गुरू चरित्र ग्रंथ पूजन हभप रामभाऊ बचाटे व ग्रा.पं. सदस्य राजूळ पवार, सद्गुरू लिलामृत पूजन मुकूंद पाटील व तानाजी करंडे श्री जगदंबा देवी व श्री वेताळ पूजन  सरपंच शशिकला शिंदे  व सरपंच काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या दिवशी  सकाळी हभप भिमराव आवटे महाराज व सायं दत्ता महाराज अंबीकर यांची कीर्तन सेवा झाली. या अद्वितीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळा भागवताचार्य हभप ऋषिकेश महाराज जोशी, हभप राम महाराज काजळेकर, श्री रामानंद महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रदीप शेळके यांच्या धर्मपीठ मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. पुरोहित्य श्रीराम पाठक यांनी केले. सुत्रसंचालन देवस्थान समितीचे सचिव किशोर मसे यांनी केले. या सोहळ्यास भाविकांची अलोट गर्दी झाली होती
 
Top