उस्मानाबाद/प्रतिनिधी-
केंद्र सरकारने काल जम्मू काश्मीरमधील कलम 370 व 35अ रद्द करून जम्मू काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग आहे हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. विश्व हिंदू परिषदेनेही वेळोवेळी याबाबत मागणी लावून धरली होती . केंद्र सरकारने जनतेच्या भावनांचा आदर करत हे कलम हटवण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला तो अभिनंदनास पात्र आहे त्यामुळे आज विश्व हिंदू परिषद उस्मानाबाद वतीने जिल्हाजिक-यांच्या मार्फत केंद्र सरकारला अभिनंदन पत्र पाठवण्यात आले. या अभिनंदन पत्रावर विंहिंप जिल्हा कार्याध्यक्ष श्री धनंजय पाटील, विंहिंप सहमंत्री हभप परमेश्वर शिंदे, श्री अजित बडवे, श्री देविदास पाठक, श्री प्रमोद खंडेलवाल, हभप रामचंद्र बचाटे महाराज, श्री महादेव सस्ते, कल्याण जोशी, दत्तात्रय झांबरे, मारुती बोरकर, अॅड ए. जी. गाडे यांच्या स्वाक्ष-या आहेत.