उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्रात स्थापनेपासुनच सहकाराचे मोठे जाळे निर्माण झालेले असुन ते टिकवून सभासदांच्या हितासाठी सहकारी संस्था काम करताना आपल्याला पहायला मिळतात. त्यामुळे सर्व सभासदांनी सातत्याने जागृत राहुन सहकारी संस्था टिकविण्यासाठी हातभार लावावा असे मत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य रामदास कोळगे यांनी मत व्यक्त केले.
शहरातील समता नगर येथील तालुका शिक्षक सोसायटीच्या सभागृहात रविवारी (दि.4) रोजी कै. अनिल सारंग सर पतसंस्था धाराशिव या संस्थेच्या 20 व्या वार्षीक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन श्री कोळगे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर राऊत होते. श्री कोळगे पुढे बोलताना म्हणाले की,गेल्या 20 वर्षात पतसंस्थेने बरीच झेप घेतलेली आहे संस्था मजबुत करण्यासाठी सर्व सभासदांनी योगदान दयावे असेही त्यांनी शेवटी सांगीतले. यावेळी सेवा निवृत्त झालेले आर.एन.शिंदे,बी.बी.शिंदे, अभिमान पेठे मुख्याध्यापक पदावरुन तर सेवक बाबुराव साळुंके यांचा सेवा निवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला तर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचाही यावेळी शंतनु अंधारे, सुमित नाईक, समर्थ मते, तेजश्री भोजणे, श्रावणी माने, शिवप्रसाद चव्हाण, आसावरी राऊत इ. गुणवंताचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी आगतराव भोयटे सर, आर.एन.शिंदे सर, पतसंस्थेचे अध्यक्ष रामेश्वर राऊत सर,मेंढेकर सर, बांगर सर यांनी आपले विचार व्यक्त केले. अहवाल वाचन सुरेश रायजादे सर यांनी तर सभासदांच्या शंकांचे निरसन केसकर यांनी केले. सुत्रसंचालन ढोले सर यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर संचालक माने सर, कांबळे सर, भांगे सर, देशमाने मॅडम सुरुवातीस कै. अनिल सारंग सर व लक्ष्मीमातेच्या प्रतीमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भारतातील सर्वक्षेत्रातील दिवंगतांना दोन मिनिट श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वांचे आभार संचालक कांबळे यांनी मानले.सर्वसाधारण सभेस सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.