वाशी/प्रतिनिधी-
संत मीरा पब्लिक स्कुल मध्ये 73 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिनासोबतच रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी डॉ उमादेवी बाराते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्याथ्र्यांनी झेंड्याला रखी बांधण्यात आली तसेच या पर्यावरणामूळेच आपले रक्षण होत असते व या पर्यावरणाने आपले रक्षण करावे,  आपल्या पृथ्वीचे रक्षण करावे  या भावनेने  चिमुकल्या विद्याथ्र्यांनी वृक्षालाच राखी बांधली  व तूच आता आमचे रक्षण कर अशी प्रार्थना केली. या विद्याथ्र्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी आलेल्या पालकांचा स्कुल च्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेच्या मुख्याधिपिका सोनल जैन,शाळेतील कर्मचारी वर्ग व पालक हजर होते.
 
Top