उस्मानाबाद/प्रतिनिधी-कोल्हापूर ,सांगली येथील पूरग्रस्तांना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी परिवार यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी लागणारे सर्व संसारोपयोगी साहित्य त्यामध्ये तांदूळ, सर्व प्रकारच्या डाळी, मीठ, शेंगदाणे, बिस्कीट, मेणबत्ती, काडेपेटी , कपडे ,नॅपकीन, टॉवेल, गहू, ज्वारी, पीठ ,तेल ,चहा पावडर, पांघरण्याची ब्लॅंकेट, बिसलेरीच्या बॉक्सची गाडी ,औषधे इत्यादी हे सर्व सामान चारशे ते पाचशे  कुटुंबांना  1 महीना पुरेल  एवढया साहित्यांने भरले गाडी सामानाची गाडी पाठवताना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर (अण्णा) पाटील,  प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील ,भागीरथी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अभिराम सुधीर पाटील यंाची उपस्थिती होती.
हे उस्मानाबाद वरून पाठवलेला सर्व सामान भागिरथी परिवाराचे सदस्य अक्षय उंबरे, मयूर चालवते हे घेऊन सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिनांक 16 ऑगस्ट 2019 रोजी पोहोचून हे सर्व सामान माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांना सुपूर्त करण्यात आले व अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना सोबत घेऊन भागीरथी  परिवाराच्या सदस्यांनी ते सामान एका दिवसामध्ये गरजू परिवारापर्यंत पोहोचवले .
 हा उपक्रम राबवण्यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी परिवार यांच्या सदस्यांनी अहोरात्र प्रयत्न केले तसेच या कार्यक्रमासाठी खानापूर गावचे सरपंच अरुण गायकवाड, स्वप्नील पाटील, आशिष शेंद्रे ,मनोज देशमुख, सोम सुर्यवंशी,आप्पा गवळी ,मनोज जाधव, भोसले सर ,जगताप सर आदी उपस्थित होते . आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व भागीरथी परिवार यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top