वाशी /प्रतिनिधी- गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण समारंभ कार्यक्रमानंतर वाशी येथील पोलिस पाटील श्री हारूण काझी यांच्या शेतामध्ये मका पिकाची पाहणी करत असताना लष्करी आळीचा प्रादुर्भाव आढळून आला. तालुका कृषि अधिकारी श्री संतोष कोयले यांनी लष्करी आळी नियंत्रणविषयी शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी लष्करी आळीच्या मुख्य चार अवस्था व लष्करी आळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे हे सविस्तर सांगितले
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये मका पिकामध्ये एकरी 5 कामगंध सापळे, पक्षी थांबे यांचा वापर करावा. लष्करी आळीच्या सुरुवातीच्या प्रादुर्भाव अवस्थेत 5% निंबोळी अर्क फवारनिविषयी मार्गदर्शन केले. रसायनिक किटकनाशकामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट 5%- 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी किंवा स्पिनोस्याड 4 मिलि प्रती 10 लिटर पाणी किंवा क्लोरनट्रीनीलीपोल 18.5% - 4 मिलि प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करनेविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषिविभाग व धांनुका अग्रोटेक प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका फळ रोप वाटिका वाशी (तालुका कृषी कार्यालय)येथे मका पिकावरील लष्करी आळी व्यवस्थापन शेतकरी मेळावा दिनांक 21/8/2019 बुधवारी सकाळी 11 वाजता आयोजित केला असून त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्री संतोष कोयले यांनी केले. यावेळी तालुका कृषि अधिकारी श्री संतोष कोयले, नायब तहसिलदार श्री भालचंद्र यादव, कृषीसाहाय्यक श्री दिनेश लोंढे, बालाजी आटोळे, अतुल पाटील, अभिजीत पाटील, वाशी येथील पोलिस पाटील श्री हारूण काझी, आदि उपस्थित होते.
