कांग्रेसचे उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी उस्मानाबाद शहराची कार्यकारणी जाहीर केली असून, यामध्ये दोन उपाध्यक्ष, दोन सहसंघटक, सचिव, कोषाध्यक्ष यांच्यासह विशेष नियंमीत सदस्यांमध्ये एकुण ६६ लोकांचा समावेश आहे. ही कार्यकारणी आ.बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्या आदेशानुसार जाहीर केल्याचे सांगण्यात आले.
उस्मानाबाद शहर अध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी शहर कॉंग्रेसची नुतन कार्यकारणी जाहीर करताना कार्याध्यक्ष म्हणुन अलिम शेख तर सरचिटणीस म्हणून संजय गजधने, उपाध्यक्ष म्हणून सलिम इस्माईल शेख व प्रमोद कोराळे, सहसचिव पदी प्रेमचंद सपकाळ, सचिव म्हणुन सय्यद फारूक हुसेन, संघटक म्हणुन बाळासाहेब मुंडे, सहसंघठक म्हणून राजु आडे व विशाल मिश्रा, कोषाध्यक्ष म्हणून गौरव बागल, सहकोषाध्यक्ष म्हणून आशिष शेलार या प्रकारे कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारणीवर विशेष निमंत्रीत सन्मानीय सदस्य म्हणून माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. स्मिता शाहापूरकर, जिल्हा कांॅग्रेसचे कार्याध्यक्ष राजाभाऊ शेरखाने, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलिल सर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ बनसोडे, युवक प्रदेश सचिव जावेद काझी, सोशल मीडीया प्रमुख अभय मुंडे, युवक जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, विधी विभागचे जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजीत शिंदे, प्रदेश मीडिया कमिटी सदस्य अॅड राज कुलकर्णी, युवक विधानसभा उपाध्यक्ष राम कदम, प्रसन्न कथले, ओबीसी जिल्हाध्यक्ष मिलंीद गोवर्धन यांच्यासह ६६ लोंकाना घेण्यात आले आहे.
