उस्मानाबाद /प्रतिनिधी-
येथील शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक कै. उध्दवराव पाटील यांच्या कन्या सौ. सुलभा पाटील (सई देशमुख) यांनी बुधवारी (दि.28) भारतीय जनता पक्षात मुंबई येथे प्रवेश केला.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीष महाजन, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावन कुळे यांच्या उपस्थितीत सौ. सुलभा पाटील यांनी भारतीय जनता पक्षात बुधवारी (दि. 28) प्रवेश केला. सौ. पाटील सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर आहेत. दरवर्षी त्या गरजू शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करतात. तसेच भाई उध्दवराव दादा पाटील फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गरीब व गरजूंना वैद्यकीय मदत केली. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना शिलाई मशिनचे वाटप केले. कर्करोग निदान शिबीराचे आयोजन केले. फौंडेशनच्या माध्यमातून सौ. पाटील यांनी अनेक जनहीताची कामे केली आहेत. भाजपा पक्ष प्रवेशानंतर बोलताना सौ.पाटील यांनी भारतीय जनताा पक्षाच्या महिला आघाडीच्या मााध्यमातून पुर्णवेळ उस्मानाबादेत काम करण्याची मनीषा व्यक्त केली.