परंडा/ प्रतिनिधी - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट,अहमदनगर यांच्या मार्फत भूम व परंडा तालुक्यातील ४० गावामध्ये पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम ईडसईंड बँकेच्या अर्थसहायातून मृदा व जलसंधारण, महिला सक्षमीकरण, शेती विकास ,पाणी व्यवस्थापण [ ताळेबंद ] इत्यादी उपक्रम राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून दि.२९ रोजी परंडा तालुक्यातील काटेवाडी येथे शाश्वत शेती विकास  कार्यक्रम संस्थे मार्फत सेंद्रीय शेतीशाळा  करण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न,जीवामृत, अर्मत पाणी,दशपर्णी आर्क, निंबोळी आर्क हे तयार करून त्याचा वापर कसा करावा याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.यासाठी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थेचे भूम व परंडा तालुक्यांचे विभाग प्रमुख कांतिलाल गिते यांनी पाणलोट विकास व व्यवस्थापन, आहारातील सेंद्रीय पदार्थाचे महत्त्व व पाण्याचा ताळेबंद आदी विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेमार्फत तालुक्यात सिमेंट बंधारे आदी कामे केल्याने मोठया प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार असून त्याचा शेतीसाठी मोठा फायदा होनार आहे.परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास शेळगांव विभागाचे प्रमुख तानाजी कासारे, संस्थेचे तांत्रिक अधिकारी नितीन पोटे, लोणारवाडीचे बाळासाहेब जामदारे, पोपट खाडे, राजेंद्र खाडे,संस्थेच्या वसुंधरा सेविका अनिता खाडे व जलसेवक विक्रम खाडे यांच्यासह ग्रामस्थ,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


Attachments area
 
Top