उस्मानाबाद / प्रतिनिधी-
गावाचा विकासासाठी लोक सहभाग आवश्यक असून , ज्या गावात लोक सहभाग वाढतो त्याठिकाणी प्रशासन सर्व प्रकारची मदत करण्यासाठी तत्पर आहे , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे केले.
सापनाई ता .कळंब येथे नेहरू युवा मंडळ , पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गेल्या नंतर ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी जिल्हा गाहिती अधिकारी श्री मनोज शिवानी सानप , नेहरु युवा केंद्राचे श्री रामचंद्र कुलकर्णी ग्रामसेवक श्री मंगेश वेदपाठक उपस्थित होते . गावामध्ये नेहरु युवा मंडळाच्या युवकांनी एकत्र येऊन खोलीकरण , सरळीकरण , वृक्षलागवड , इत्यादी काम केले असून डिपसीसीट पध्दतीने काग कले . या पध्दतीने पाणी भरण्याची प्रक्रीया जास्त प्रमाणात होते आहे . यामध्ये युवकांनी 1, 43, 000 खर्च केला आहे . पाणी साठवण्यासाठी मोठी प्रक्रीया सुरु झाली असून , यामुळे गावातील विहिरी , बोर सुरू झाले आहेत अशी माहिती नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष श्री सुहास कांदे यांनी दिली . जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाल्या की , महिलांचा सहभाग वाढवणे आवश्यक असून , गावामध्ये ग्रामसभा घेऊन पर्ण कामाचा आराखडा तयार करा व तो जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करा जेणे करुन भविष्यातील नियोजन करून लोकसहभाग व प्रशासन गिळून पाणी प्रश्न , वृक्षलागवड इत्यादी कामाला गती देता येईल . यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी झालेल्या सर्व कामाची पाहणी करून कशा प्रकारे काम झाले आहे . तेही जाणून घेऊन ग्रामविकासासाठी काही उपयुक्त सुचना पण केल्या.