उस्मानाबाद/प्रतिनिधी- डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस आळणी- गडपाटी येथील कृषि महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे वडगांव (ज) ता.कळंब येथे खरीप हंगाम शेतकरी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.
शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे, शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून यशस्वी शेती करून दिशादर्शक म्हणून समाजात स्थान निर्माण करावे, ग्रामीण युवकांनी आणि विध्यार्थ्यांनी शासकीय नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यामधून व्यावसायिक बनून आपला विकास साधावा असे आव्हाहन करून शासनाच्या विविध योजनांची माहिती श्री. सुभाष चोले ( कृषि उपसंचालक, उस्मानाबाद) यांनी दिली. कृषि विज्ञान केंद्र तुळजापूरचे कार्यक्रम समन्वयक प्रा.सचिन सूर्यवंशी, यांनी ही शेतकऱ्यांना खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी कोणते बियाणे वापरावे, कोणत्या फवारण्या कराव्या याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान केंद्र तुळजापूरचे विशेषज्ञ प्रा. डॉ. भगवान आरबाड,प्रा. प्रवीण चव्हाण व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. दंडनाईक यांनीही शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मशागत, बीज प्रक्रिया, खतांचा वापर, कीटकनाशके कोणती फवारावीत, तणनाशक कोणते फवारावे याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मा. श्री. सुभाष चोले कृषि उपसंचालक उस्मानाबाद, कृषि विज्ञान केंद्र तुळजापूरचे विशेषज्ञ प्रा. डॉ. भगवान आरबाड,विशेषज्ञ प्रा.गणेश मंडलिक, कृषि विद्यावेत्ता प्रा. प्रवीण चव्हाण, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. दंडनाईक,सरपंच सौ. कमल नवले, उपसरपंच सौ. निता वाघमारे, कृषि सहाय्यक कदम साहेब, ग्रामसेवक संजय भगत, मा. सरपंच आनंद जेवे, ग्रा.पं.सदस्य आबासाहेब नवले, दत्तात्रय मुंडे, नितीन जेवे, भाऊसाहेब मुंढे व वडगांव पंचक्रोशीतील शेतकरी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिदूत शुभम जगताप यांनी केले तर आभार ज्ञानेश्वरी डिकले यांनी मानले. हा शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व गावांमधील कृषिदूत,मार्गदर्शक प्राध्यापकएन. एस. सुतार, डी. एस. शेटे, एस. एन. पाटील, एस. ए. दळवे, एस. बी. कोरके, आर. आर. देशमुख, आर. बी. रनेर, के. बी. थोरात, के. ए. बुरगुटे, ए. जी. गारडी,कृषि सहाय्यक,व ग्रामपंचायतचे सहकार्य लाभले.