लोहारा/प्रतिनिधी-
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष कैलास (दादा) शिंदे यांचा वाढदिवस लोहारा तालुका भाजपाच्यावतीने शहरातील लोकवाचनालय येथे विविध सामाजिक उपक्रम घेवुन साजरा करण्यात आला. या वाढदिवसानमित्त शहरातील व तालुक्यातील गरिब गरजुवंत महिलांना मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. तसेच लोकवाचनालय व बसस्थानक परिसरात विविध वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. व तसेच शहरातील तालुका ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. असे विविध सामाजिक उपक्रम राबवुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा नोंदणी प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटिल, पं.स.सदस्य वामन डावरे, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, शुभाष गिरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, मिडिया तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, लोकवाचनालयाचे सचिव माणिक तिगाडे, विजय महानुर, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, बालासिंग बायस, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ घोडके, आेबीसी शहराध्यक्ष सुमित झिंगाडे, शहराध्यक्ष अशोक तिगाडे, तुकाराम विराेधे, दादा काळे, सदाम सुंबेकर, अब्बास शेख, गणी शेख, लक्ष्मण भाेरे, मनिषा महानुर, जयश्री लांडगे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित हाेते.
 
Top