तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्रात अल्प काळात सर्वाधिक प्रतिष्ठेचा व  मानाचा ठरलेल्या पौष महिन्यातील शारदीय नवराञ उत्सव काळात घेतला जाणारा श्रीतुळजाभवानी सांस्कृतिक कला क्रिडा महोत्सव तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार जो  खंडीत पडला होता. ती  परंपरा अखंडीत चालु ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे यांनी पञकारांशी बोलताना दिली.
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने सुमारे पंधरा लाख रुपयाचे जीवनावश्यक साहित्य पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी मंगळवार राञी प्रथम पुजन श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंढे, एस डीओ चेतन गिरासे नगराध्यक्ष बापुसाहेब कणे तहसिलदार योगिता कोल्हे यांच्या हास्ते पुजन करुन सदरील वाहने एसडीओ यांच्या नेतृत्वाखाली रवाना करण्यात आली.  त्यानंतर  प्रशासकीय कार्यालयात पञकारांशी वार्तालाप करताना जिल्हाधिकारी मुंढे म्हणाल्या की, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी पन्नास लाखाची मदत देण्यात येणार असुन पंचवीस लाख रुपये धनादेश द्वारे व  पंचवीस लाखाचे  अत्यावश्यक साहित्य देणार असुन पहिला टप्यात तीन वाहनांमधुन सुमारे तेरा लाखाची मदत पोहचवली जात असुन हा पहिला टप्पा असुन उर्वरीत दुस-या टप्यात मागणी प्रमाणे मदत केली जाणार आहे. ही मदत पलूस येथे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे   स्वता  घेवुन जात आहेत. या मदतीसाठी चँरेटी कमिश्नरचा सल्ला घेतल्यानंतर ही मदत दिली जात आहे . श्री तुळजाभवानी कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव व तुळजाई स्ञी शक्ती पुरस्काराची परंपरा मागील काही वर्षात खंडीत झाली होती. आता श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान उत्पन्नात वाढ होत असल्याने ही परंपरा चालु करण्याबाबतीत विचार केला जाई, असे यावेळी म्हणाले.
यावेळी पञकारांना सांस्कृतिक महोत्सवा बाबातीत माहीती देताना उपविभाग अधिकारी चेतन गिरासे म्हणाले की, प्रथमता  हा महोत्सव कमी कालावधीकरीता घेवुन खंडीत परंपरा चालु  करण्याचा प्रयत्न करु,असे यावेळी म्हणाले. यावेळी तहसिलदार तथा विश्वस्त योगीता कोल्हे  यंाची उपस्थितीत होती.

 
Top