उस्मानाबाद/प्रतिनिधी-
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी प्रवास व्हावा म्हणून स्लिपर कोच बसेसची निर्मिती चालू केली. मुलींना १२ वी ते पदवीत्तर पर्यंत बस प्रवास मोफत केला. अपघातात कर्मचारी अथवा प्रवाशी मृत पावल्यास तीन लाखाच्यावर निधी देण्याचा निर्णय घेतला. ज्या कर्मचा-यांचे वेतनवाढ जूजबी व्हायची त्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. ९० वास्तूविशारद व  १४२ अभियंत्यांची नियुक्ती सुसज्ज व सुविधापुर्ण, अत्याधुनिक  बसस्थानकांची निर्मिती करण्यासाठी करण्यात आली. अशा अनेक महत्वपुर्ण निर्णय घेऊन एसटी महामंडळाच्या कारभारात आमुलाग्र बदल केला. कर्मचारी व प्रवाशांच्या हितासाठी अनेक सुविधा निर्माण करून दिल्या, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले.
उस्मानाबाद बसस्थानकाच्या नव्याने बांधण्यात येणा-या भूमीपुजन कार्यक्रमात ना.रावते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत, खा.ओमराजे निंबाळकर, शंकरराव बोरकर, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, आ.ज्ञानराज चौगुले, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, सह.संपर्क प्रमुख अनिल खोचरे,जिला परिषद सीईओ संजय कोलते, जिल्हा प्रमुख कैलास पाटील आदी उपस्थित होते. ना.रावते यांनी एक वर्षांच्या आत ह्या बसस्थानकाचे काम पुर्ण होईल, असे जाहीर केले. जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव करून पत्रकारांनी केलेली टिका सकारात्मक घेणे महत्वाचे आहे. पत्रकारांचे लिखान हे व्यापक दृष्टीकोनातून लिहिलेले असते. मंत्रीमंडळाचे खाते वाटप झाल्यानंतर शिवसेने कमी महत्वाचे खाते दिले जात असल्याची चर्चा होती. अशा प्रकारचे चर्चा म्हणजे एक प्रकार की बनवाबनी होती. प्ररंतू या दिलेल्या मंत्रीपदाचा वापर पुरेपूर जनहितासाठी केला आहे, असे सांगितले. पालकमंत्री, प्रा. तानाजी सावंत यांनी जिल्हयात पक्षांतरातून व होत असलेल्या परिवर्तनाविषयी टिका करून लोकसभेचे युध्द चालु असताना कृष्ण व अर्जुन आम्ही दोघेच उध्द करत होतो. आज परिवर्तनाची भाषा करणारे लोक आमच्या विरोधात होते, असे सांगून माणसे घेऊन परिवर्तन होत नसते,उलट  आमचा मित्र पक्ष असलेला भाजपाचा उल्लेख न करता तो अद्योगतीला जाईल, अशी टिका केली. यावेळेस ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील व भाजपा प्रवेशाचा उल्लेख न करता जोरदार टिका करत या बसस्थानकाची भूमीपूजन करण्याची ही दुसरी वेळ आहे. जिल्हयात फक्त आतापर्यंत विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. परिवर्तनाची भाषा केली जात होती, परंतू जो पर्यंत स्वत: मध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत यश येणार नाही, असे सांगितले. या कार्यक्रमात रवी कोरे यांनी बसस्थानक पुर्नबांधणी काम लवकर सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्याचाही मंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद एसटी विभागाचे विभाग नियंत्रक राजीव साळवे यांनी दिवाकर रावते यांच्या कार्याच्या कौतुक करत रावते परत मंत्री होतील, त्यांच्याच हस्ते या बसस्थानकाचे उद्घाटन होईल. १६३ महिला चालकांची भरती करून विभागात एक प्रकारची नवी दिशा दिली आहे. ते आमचे नरेंद्र मोदी आहेत, असे सांगून तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रम सूत्रसंचालन वैभव कुलकर्णी यांनी केले तर आभार कोंडो यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्वजीत जानराव, उबाळे, शरद पाटील, गणेश राजगिरे, सुनिल हुंडेकर आदींनी परिश्रम घेतले. 
 
Top