तुळजापूर /प्रतिनिधी-
येथील श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ व व्यापारी वर्गा तर्फ कोल्हापूर व सांगली येथील महापूर आपत्तीग्रस्तांना गव्हु , ज्वारी पीठ , साखर, तांदूळ चहापत्ती, टुथब्रश पेस्ट , तेल सह अन्यधान्य आदी  दैनंदिन वस्तुंच्या  ारशे किट पूरग्रस्तांना मदत  म्हणून पाठवण्यात आली.
यासाठी तिर्थक्षेञ तुळजापूर येथील पुजारी वृंदाच्या घरातून अन्नधान्य साहित्य वस्तू संकलित करण्यात आल्यानंतर मंगळवार 21 ऑगस्ट रोजी वाहनातून सातारा सांगलीला पाठवून देण्यात आले. या वाहनाचे पूजन तहसिलदार योगीता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सज्जन सांळुके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, जेष्ट पुजारी अशोक मगर,  सुधाकर धुमाळ, संचालक शांताराम शिंदे, भारत कदम,  सचिन कदम, संभाजी भांजी,  विजय भोसले, जिवनराजे इंगळे, संजय पेंदे अदिसह पुजारी वृंद उपस्थितीत होते.
 
Top