वाशी/प्रतिनिधी-
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व ग्रामीण रुग्णालययांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही एड्स जनजागृती शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. या शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एकूण 95 विद्यार्थी-विद्यार्थिनीने तपासणी करून घेतली.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे यांनी भारतात व महाराष्ट्रात या आजाराची प्रतिबंधात्मक व्यापक मोहिम राबवून शासनस्तरावर जनजागृती, रक्ताची सुरक्षितता, रोग सर्वेक्षण स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, इ.मार्फत जनजागृती केली जाते. एच.आय.व्ही./ एड्स आजाराविषयी असलेले समज- गैरसमज, रोगाचा प्रसार कशामुळे याचे प्रबोधन, शिक्षण व समुपदेशन शासनस्तरावर राबविलेली मोहिम व जनजागृती आमची युवा शक्ती करु शकते.
एच.आय.व्ही./ एड्स हा आजार फक्त वैद्यकीय प्रश्न नसून तो एक सामाजिक प्रश्न बनला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत्वे 15 ते 49 वयोगटात आहे. एखाद्या कौटुंबिक स्तरावर घरातील कमावती व्यक्ती बाधित झाल्यास संपूर्ण कुटूंबावर आणि पर्यायाने समाजावर त्याचे विपरीत परिणाम होतात. यात युवकांचे प्रमाण जास्त असल्याने युवाशक्तीने ठरविल्यास या आजाराला प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यासाठी युवाशक्ती पुढे येऊन समाजात जनजागृती करु शकते. यात यशही आलेले आहे. म्हणून एच.आय.व्ही./ एड्स चे प्रमाण कमी झालेले आहे. असे ते म्हणाले
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे आय.सी.टी.सी समुपदेशक श्री.परमेश्वर तुंदारे, श्री.संतोष बुधोडकर, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.विश्वास चौधरी, प्रा.राजाभाऊ बनसोडे, प्रा.डॉ.बालाजी देवकते, प्रा.शाम डोके, प्रा.डॉ.विलास गरड, प्रा.डॉ.अभिमान माने, प्रा.राजेश उंदरे उपस्थित होते.
या शिबिराचे प्रास्ताविक प्रा.विश्वास चौधरी यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.डॉ.बालाजी देवकते, तर आभार प्रा.राजाभाऊ बनसोडे यांनी मानले. या शिबिराला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी विद्यार्थी-विध्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.