उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील पानगाव येथील एक विद्यार्थिनीचा पैशाअभावी वैद्यकीय प्रवेश रखडल्याचे समजल्यानंतर शिवसेनेच्या वतीने उस्मानाबाद पालिकेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी आर्थिक मदत केली.
नगराध्यक्ष राजेंनिबाळकर हे पानगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी दुष्काळाच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी ग्रामस्थाद्वारे विद्यार्थीनी प्रांजली हिच्या विषयी माहिती मिळाली । या विद्यार्थीस वैद्यकीय प्रवेशासाठी २ लाख १५ हजार रूपयाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले । ही माहिती मिळाल्यानंतर नगराध्यक्ष राजेंनिबाळकर ने शिवसेनेच्या वतीने प्रांजलीस भरीव आर्थिक मदत केली. तसेच पदाधिकारी, कार्यकत्र्यांना ही आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.  
 
Top