परंडा /प्रतिनिधी -
परंडा नगर परिषदेत प्रधानमंत्री जन आरोग्य  योजना अंतर्गत  लाभार्थीचे  नावनोंदणी दिं.19 ते 23 आँगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे.
या नोंदणी नंतर गोल्डन कार्ड रु.30 चा भरणा केल्यावर मिळणार आहे. या गोल्डन कार्ड वर 1350 आजार, रोगावर रु.5 लक्ष मर्यादेत नामांकित 900 रूग्णालयातून मोफत उपचार मिळणार आहेत. शासना कडून प्राप्त सेकंद (सामा.आर्थिक  जातनिहाय  यादी नुसार ) यादीतीलच लाभार्थीची नोंदणी करुन घेण्यात येत आहे. तरी शहरातील सर्व लाभार्थी यांनी याचा लाभ घ्याव, असे आवाहन न.प.चे मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी केले आहे.

 
Top