उस्मानाबाद/ प्रतिनिधी- येथील, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या , रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र आयोजित आयसीआयसीआय बँकेच्या परिसर मुलाखतीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या मुलाखतीसाठी 102 उमेदवारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 90 विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते .पैकी 71 विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली होती. त्यापैकी 51 विद्यार्थ्यांची आयसीआयसीआय बँकेमध्ये निवड झाली आहे.त्यामुळे परिसरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या मुलाखती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख व प्रमुख पाहुणे आयसीआयसीआय बँकेचे श्री हर्षल कुदळे यांच्या उपस्थितीत झाल्या होत्या. यावेळी प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आम्ही महाविद्यालयांमध्ये नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असतो. शहरी विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी यासाठीच या मुलाखती ठेवल्या आहेत. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांबरोबरच बीड, औसा,लातूर,तुळजापूर, भूम, बार्शी,परांडा इत्यादी ठिकाणावरून विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना , स्पर्धा परीक्षा विभागाचे चेअरमन प्रा.मारूती लोंढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांना रोजगार व नोकरीच्या संधिची माहिती दिली जाते.विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षेविषयी ची तयारी करून घेण्याबरोबरच रोजगाराच्या मेळाव्याचे आम्ही सातत्याने आयोजन करत असतो.
कार्यक्रमाचे आभार प्रा संदीप देशमुख यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एन एच गायकवाड यांनी केले. या मुलाखतीसाठी महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.