प्रतिनिधी /तुळजापूर - दोन शेतकऱ्यांमध्ये एक विद्युत डीपी या योजनेंतर्गत तालुक्यात पाच हजार डीपी मंजूर करण्यात आल्या आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे यांनी सांगितले. 
केमवाडी येथे डीपीच्या उद्घाटनाप्रसंगी अॅॅड. काळे बोलत होते. यावेळी केमवाडीचे सरपंच राजू डोलारे व उपसरपंच गौरीशंकर नकाते यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. काळे म्हणाले की, केमवाडीला २४ डीपी मंजूर झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना पुढच्या टप्प्यात डीपी मंजूर होणार आहे. तसेच केमवाडी ते दारफळ हा ८० लाखाचा रस्ता पूर्ण झाला आहे. तसेच ३२ लाख रुपये शेळी व मेंढीसाठी मंजूर झाले. अनेक विहिरी मंजूर झाल्या, उज्ज्वला मोफत गॅस महिलांना मिळाला, शेतकऱ्यांना पेन्शन मंजूर झाली, पीकविमा चांगला मिळाला, मराठा समाजाला आरक्षण मिळाले. सूत्रसंचालन विनोद फडके यांनी केले. याप्रसंगी हरिबप्पा काळे, मनोज काशीद, बालाजी काळे, सोमा सातपुते, शहाजी सातपुते, शिवाजी सातपुते, ग्रामस्थ उपस्थित होते. 

 
Top