भूम/प्रतिनिधी-आपण आपल्या मुलांना जवळ ठेवून चांगल्या शाळेत चांगले शिक्षण देऊ शकतो ही बाब मनात रुजने महत्त्वाचे आहे. मुलांना बाहेरगावी चांगली शाळा आहे म्हणून गावापासून दुस-या गावी दररोज पाठवता. परंतु प्रत्येक गावकरी मंडळींनी शंभर रु. दर महिन्याला शाळेला दिले तर त्यांतून पाहिजे तशी गावातील जिल्हा परिषदेची शाळा चांगली सुख सुविधा व शिक्षण देऊ शकते असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते तथा पुणेचे उद्योजक प्रविण रणबागुल यांनी केले.
  वडगाव (नळी) येथे शाळेतील विध्यार्थी  प्रविण रणबागुल यांच्या मार्गदर्शनाने आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिक श्री.माणिक  भोजने यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण शालेय साहित्य (ड्रेस,शूज,सॉक्स,टाय,असे पूर्ण  किट) वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच श्री.विठ्ठल वाघमोडे, मुख्याध्यापक श्री.अवसरे  सर, साबळे सर, भोगील सर, बोराडे सर, बबन जावदे, अमोल येळे, पोलीस पाटील चांगदेव आहेर. ग्रामसेवक  मुंडे साहेब, बिभीषण वाघमोडे, संपत समिंदर,राम माने, तसेच असंख्य प्रमाणात गावातील  महिला व पुरुष उपस्थित होते.
 
Top