उस्मानाबाद/प्रतिनिधी-
दि.१८ ते २५ ऑगस्ट २०१९ पर्यंत उस्मानाबाद शहरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शखा उस्मानाबाद महाराष्ट्र राज्य संस्कृतीक कार्य संचालनालय मुंबई, दक्षिणेस मध्य क्षेत्र, सांस्कृतीक केंद्र नागपूर, सांस्कृतीक मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त वतीने राष्ट्रीय लोककला महोत्सव उस्मानाबाद शहरात होत आहे. या महोत्सवात भाग घेण्यासाठी राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या पाच राज्यातून कलाकार येत असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाटय परिषद उस्मानाबाद के जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे ने पत्रकार परिषदेमध्ये दिली.
उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे होणा-या या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास खा.ओमप्रकाश राजेंनिबाळकर, जिल्हाधिकारी सौ.दिपा मुधोळ-मुंढे, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई अध्यक्ष प्रसाद कांबळी, लोककला आकादमी मुंबईचे डॉ.गणेश चंदनशिवे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, उद्योजक आशिष मोदाणी, नाट्य परिषदेचे कार्यवाहक धनंजय शिंगाडे आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात कै.गंगाधर शिंगाडे, राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने रघुवीर खेडकर, गुलाबराव कदम, सौ.मंगलाताई बनसोडे, निरंजन भाकरे, आदीनाथ विभुते, राजेंद्र अत्रे यांचा सम्मान करण्यात येणार आहे. १९ ते २४ पर्यंत एकांकिका स्पर्धां, सुगम गायन नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत. एकांकिका स्पर्धेमध्ये पुणे, मुंबई, बीड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, सातारा, नाशिक आदी जिल्हयातुन ३४ एकांकिका संघाने भाग घेतला आहे.दि.२५ ऑगस्ट रोजी समारोह सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top