परंडा/प्रतिनिधी-दि.२४ रोजी येथील शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयात नॅक विभागाच्या वतीने एक दिवशीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रिपरेशन फॉर नॅक अॅन्ड एस एस आर. रायटिंग या विषयावर हि कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रमूखपाहूणे व मार्गदर्शक म्हणून डॉ.व्ही.एम.गूरमे समन्वयक यूजीसी समिती तथा सदस्य नॅक समिती श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी हे उपस्थित होते. व्यासपीठावर कार्यशाळेच्या अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे या उपस्थित होत्या तर नॅक समन्वयक प्रा. विद्याधर नलवडे, आय.क्यू.ए.सी.समितीचे समन्वयक प्रा.दिपक तोडकरी हे उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी वरिष्ठ विभागातील सर्व शाखेचे प्राध्यापक उपास्थित होते. या वेळी प्रास्ताविक नॅक समन्वयक प्रा.विद्याधर नलवडे यांनी केले. डॉ.गुरमे यांनी नॅक संदर्भात सांगीतले कि सर्व क्रायटरियाचे सविस्तर वाचन केल्यास व त्या त्या क्रायटरीयाच्या पूर्तता केल्यास हमखास यश मिळेल.नॅक हे एक मूल्यांकन आहे लहान सहान गोष्टीकडे समितीमधील सदस्य पाहू शकतात तेव्हां आपल्याकडून काही कसर राहणार नाही याची दक्षता प्रत्येक विभागाने घ्यावयाची आहे.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या कि येणाऱ्या नॅकला सामोरे जाण्यासाठी सर्वानी सज्ज राहणे गरजेचे आहे नॅकसाठी जी काही मदत करावयाची आहे ती मदत करण्यासाठी महाविद्यालय तयार आहे. सर्वानी आपापले क्रायटेरिया काळजीपूरक तयार करावेत यावेळी डॉ.गूरमे यांनी सर्वाबरोबर चर्चा केली. सुत्रसंचलन प्रा.विद्याधर नलवडे यांनी केले तर आभार प्रा.दिपक तोडकरी यांनी मानले.