लोहारा/प्रतिनिधी-
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधुन लोहारा तालुक्यातील अचलेर येथील जि.प.प्रा.शाळा व कन्याशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा  करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये 1 ते 4 थी पर्यंतच्या मुलांनी कृष्णाची वेशभूषा तर मुलींनी राधेची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. प्रा.शाळेतील मुलांनी अंधश्रद्धा रुपी तर मुलींनी स्त्री-पुरुष समानतेची प्रचिती देत दहीहंडी फोडली. अतिशय उत्साह पूर्ण झालेल्या या कार्यक्रक्रमासाठी पालकांनी तसेच ग्रामस्थांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे आयोजन मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक के.
एल. खंडागळे व मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक सि.एम.आळंगे यांनी केले होतै. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळेचे शिक्षक वृंद एस.एल. सोमवंशी, एन.एच.डुकरे, बी.ए. करवर , जे.वी.अष्टेकर, बी.एस. बुकन, जी.आर. काळे, ए.एल.बाभळे, एम.टी.डोईफोडे, श्रीमती आर डी.पटवारी, स्वामी, अदिंनी परिश्रम घेतले.

 
Top